Bank Of India

पैशांची गुंतवणूक

या योजनेमध्ये वार्षिक गुंतवणुकीसाठी काही मर्यादा देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी हजार रुपयांपासून तर दीड लाख रुपये प्रति वर्ष एवढी गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारने तुम्हाला मासिक, त्रय मासिक आणि वार्षिक स्वरूपात पैसे जमा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देण्यात आलेली लवचिकता ही पालकांना सोयीस्कर ठरते. त्यांच्या सोयीनुसार ते पैसे जमा करू शकतात.

करसवलत

या बचत खात्याची मुदत ही 21 वर्षांपर्यंत असते. जर तुम्ही या सरकारच्या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला कर मधून सुद्धा सूट मिळते आणि 21 वर्षानंतर जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती सुद्धा करमुक्त असते. ही योजना केंद्र सरकारतर्फे चालवले जाते त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे हे अत्यंत सुरक्षित असून यामध्ये परताव्याची हमी शंभर टक्के आहे.

कागदपत्रे

या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला मुलीचे जन्म प्रमाणपत्र लागेल, पालकांचा ओळखपत्र लागतील, रहिवासी पुरावा लागेल आणि मुलीचा अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो लागेल. ही कागदपत्रे घेऊन तुम्ही नजीकच्या बँकेमध्ये किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

पैसे काढण्याचे नियम

जर तुम्हाला काही कारणास्तव पैसे लागत असतील तर तुम्ही मुलीची वय 18 वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर या बचत खात्यातील 50% रक्कम काढू शकता.
ही रक्कम तुम्ही तिच्या विवाहासाठी किंवा शिक्षणासाठी वापरू शकता. या योजनेतील संपूर्ण रक्कम हे तुम्ही 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच काढू शकता.

या योजनेमध्ये तुम्हाला हप्ते वेळेवर भरावे लागतील जर उशीर झाल्यास तुम्हाला पन्नास रुपये दंड आकारला जातो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला या योजनेची संपूर्ण रक्कम भरावी लागते. जर तुम्हाला खाते तुमच्या एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचे असेल तर हे सोयीस्कर आहे आणि यासाठी कोणते पैसे द्यावे लागत नाहीत.

ही योजना मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देते आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पायाभरणी करते. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गुंतवणूक आहे. पालक आपल्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करू शकतात. या योजनेचे असणारे खूप छान उद्दिष्टे आकर्षक परतावा सुरक्षित गुंतवणूक सरकारची हमी यांमुळे ही योजना पालकांसाठी एक उत्तम गुंतवणूक योजना ठरते